Share

Uddhav Thackeray | ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना iPhone वापरण्याची सूचना?; नेमकं प्रकरण काय?

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात भाजप-शिवसेनेचं (BJP-Shiv Sena) सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणानंतर खबरदारी म्हणून उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार यांना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर येतेय. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas … Read more

Published On: 

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात भाजप-शिवसेनेचं (BJP-Shiv Sena) सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणानंतर खबरदारी म्हणून उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार यांना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर येतेय.

याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फोन टॅपिंगचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. अंबादास दानवे म्हणाले की, “याबाबत पक्षाकडून अधिकृत सूचना नाही. मात्र अनेकदा बोलताना चुकून चार चौघात एखादा शब्द निघून जातो. त्यामुळे रेकॉर्डिंग होते आणि त्याचा मोठा विषय बनवला जातो.”

“आत्ताच्या घडीला ज्याप्रमाणे राजकारण सुरू आहे, त्यानुसार आपापली सुरक्षा घेण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षातील प्रमुख लोकांनी आयफोन (I-Phone) वापरला पाहिजे अशा सूचना मी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांना दिल्या आहेत”, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सरकारचं जाणीपूर्वक सर्व हालचालींवर लक्ष असतं. आताचं सरकार कोणत्याही स्तराला जावू शकते. हे सरकार छोट्या-छोट्या शिवसैनिकांना त्रास देत आहे. त्यामुळे सरकारवर विश्वास नसल्याचं अंबादास दानवे म्हणालेत. सरकार गैरफायदा घेऊ शकतं म्हणून अशा सूचना आम्ही देत असतो, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही