Shubhangi Patil | काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार न केल्याच्या आरोपावर शुभांगी पाटलांचं स्पष्ट वक्तव्य

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीकडे अवध्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पण महाविकास आघाडीच्या उमेदवार असतानाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांचा प्रचार केला नाही आणि अनेक ठिकाणी त्यांचे बुथही नव्हते, असा आरोप होतो आहे. यावर बोलताना स्वतः शुभांगी पाटील यांनी स्पष्टपणे आपली भूमिका सांगितली आहे.

“मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यासाठी प्रचार केला नाही याविषयी मला तरी माहिती नाही. जळगाव, धुळे, नंदूरबार, अहमदनगर किंवा नाशिकमध्ये प्रत्येक ठिकाणी मी पोहचण्याआधी महाविकासआघाडीचे नेतेमंडळी हजर होते. मला रस्त्यावर घेण्यासाठीही तेच होते. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी काम केलं नाही, असा कोणताही विषय नाही”, असे शुभांगी पाटील म्हणाल्या आहेत.

‘मी भाग्यवान, जनतेने प्रेम केलं’

“मला जेवायला वेळ मिळत नव्हता, तर लोक मला खायला घेऊन येत होते. माझ्याजवळ रडत होते. शुभांगी पाटीलवर जितकं प्रेम केलं, तितकं प्रेम जनतेने कोणावरच केलं नसेल. मी भाग्यवान आहे. त्यामुळे कोणी काहीही सांगो, बलाढ्यशक्तींनी सांगितलं तरी विजय माझा आहे,” असा विश्वासही शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.