Shubhangi Patil | “…त्यामुळे विजय माझाच”; शुभांगी पाटलांचा विश्वास

Shubhangi Patil | नाशिक : शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणूक गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत. नाशिकमधील उमेदवार निवडीवरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यावरून बंडखोरी करत थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजीत तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे.

अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण 5 पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचा निकाल आज संध्याकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या निकालाआधीच शुभांगी पाटलांनी आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

“विजय फार दूर नाही. फार चांगल्या मतांनी हा विजय होईल. मतदान 1 लाख 29 हजार 456 इतकं झालं आहे. त्यातून बाद होणाऱ्या मतांनंतर कोटा ठरवला जाईल. जे प्रमाण ठरवलं जाईल, त्यानुसार विजयी उमेदवार ठरेल. त्यानुसार विजयासाठी जो कोटा आहे, त्यापेक्षा जास्त मतदारांना मी वैयक्तिकरीत्या ओळखते. त्यामुळे विजय माझाच आहे”, असे शुभांगी पाटील म्हणाल्या आहेत.

आणखी काय म्हणाल्या शुभांगी पाटील?

“चाळीसगावमध्ये किती झालं, खांदेशात किती झालं, नगरमध्ये किती झालं, नाशिकमध्ये किती मतदान झालं हे मी बुथनुसार सांगू शकते. काहीही सांगितलं तरी मतदार माझा होता. एवढं प्रेम जनतेने कोणावरच केलं नसेन, जेवढं माझ्यावर केलं,” असंही शुभांगी पाटील म्हणाले आहेत.

‘किती मतदान झालं हे बुथनुसार सांगू शकते’

“चाळीसगावमध्ये किती मतदान झालं, खांदेशात किती झालं, नगरमध्ये किती झालं, नाशिकमध्ये किती मतदान झालं हे मी बुथनुसार सांगू शकते. काहीही सांगितलं तरी मतदार माझा होता. एवढं प्रेम जनतेने कोणावरच केलं नसेन, जेवढं माझ्यावर केलं,” असंही शुभांगी पाटलांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :