Magh Vari Utsav | मराठवाड्याच्या छोट्या पंढरीत भाविकांची मांदियाळी

Magh Vari Utsav | भोकरदन: गेल्या अनेक दशकांपासून मराठवाड्यातील छोटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील अनवा या गावात माघ वारी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. अनवा येथील संत श्री विठोबा दादा महाराज श्रीरुक्मिणी पांडुरंग संस्थानाद्वारे या उत्सवाचे आयोजन केले जाते. संत श्री विठोबा दादा महाराज चातुर्मास्ये रुख्मिणी पांडुरंग श्रीक्षेत्र अनवा येथे बुधवारी जया एकादशी (माघी वारी) निमित्त भव्य रथ यात्रा व दिंडी सोहळा अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मध्य प्रदेश, विदर्भ , पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

दि. ०१ फेब्रुवारी बुधवार रोजी श्रीक्षेत्र अनवा जया एकादशी (माघी वारी) निमित्त श्री संस्थानचे पंधरावे अधिपती श्रीगुरु पू. श्री माऊली महाराज चातुर्मास्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १.३० वाजता श्रीविठ्ठल मंदिरातून भव्य रथयात्रा व दिंडी सोहळा अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.

दिवसभर मंदिराच्या परिसरात भव्य रक्तदान शिबिर, रोग निदान शिबिर सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी ह.भ.प. श्री कैवल्य महाराज चातुर्मास्ये , ह.भ.प. राज महाराज, ह.भ.प. राधेश्याम महाराज, ह.भ.प. पराग महाराज, ह.भ.प. सास्ते महाराज यांच्यासह मध्य प्रदेश, विदर्भ , पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

संत सद्गुरु श्री विठोबा दादा महाराजांनी सतराव्या शतकात श्रीक्षेत्र अनवा येथे भगवान श्रीपांडुरंगाची व आईसाहेब रुख्मिणी मातेची स्थापना केली होती. तेव्हापासून आतापर्यंत उत्सवाची परंपरा कायम आहे, यंदाचा अंदाजे २७६ वा उत्सव साजरा होत आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.