Siddharth Malhotra & Kiara Advani | अखेर लग्नाचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी सिद्धार्थ-कियारा बांधणार लग्नगाठ

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Siddharth Malhotra & Kiara Advani | मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहे. या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. लवकरच हे दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी 6 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार आहे. 5 फेब्रुवारीपासून या दोघांचे लग्न आधीचे सोहळे पार पडणार आहे. यामध्ये हळद, मेहंदी, साखरपुडा यांचा समावेश असेल. मीडिया रिपोर्टनुसार, हे दोघे जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहे. या दोघांचा लग्न सोहळा 100 ते 125 पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. सूर्यगड पॅलेसमधील लक्झरी व्हीला पाहुण्यांसाठी बुक करण्यात आला आहे. 4 फेब्रुवारीपासून सूर्यगड पॅलेसमध्ये पाहुणे पोहोचायला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी 2021 मध्ये ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटानंतर या दोघांची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमध्ये दिसणार आहे.

दुसरीकडे कियाराच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर सध्या कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe