Bachhu Kadu | “पुढीलवेळी हिंदी बोलता येत नसेल तर दुसऱ्याकडून अर्थसंकल्प सादर करा, नाहीतर…”; बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

Bachhu Kadu | अमरावती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून यावर टीका सुरू असतानाच आता आमदार बच्चू कडू यांनी यंदाच्या अर्थसंकल्पावरून एक मोठं विधान केलं आहे. अर्थसंकल्प इंग्रजीत सादर करण्यात आल्याने बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, “अर्थसंकल्पीय भाषण म्हणजे लोकांना या सरकाचा आरसा असतो, ते तुम्ही द्या. अर्थसंकल्पीय भाषणाचे अनेक किस्से असेच आहेत, की भाषण खूप मोठं असतं परंतु कृतीमध्ये किती येतं, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून यामध्ये काही समाधानकारक गोष्टी आहेत. पण यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्याचा भाग सुटलेला आहे. बेघरांच्या घरांचा भाग सुटलेला आहे. मजुरांचा भाग सुटलेला आहे.”

“सगळ्यात मोठी दु:खाची गोष्ट अशी आहे, की अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडला गेला आहे. कुसुमाग्रज म्हणत होते भाषा मरते आणि त्यासोबतच देशही मरत असतो. या देशाची राष्ट्रीय भाषा ही हिंदी आहे आणि लोहिया असे म्हणायचे की, ज्या भाषिकांनी तुम्हाला निवडून दिलं त्या भाषेत तुम्ही सभागृहात बोललं पाहिजे. जेणेकरून सामान्य माणसाला ते समजेल”, असं देखील बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले.

आपल्या देशाचा बहुभाषिक हा हिंदी भाषा बोलणारा असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिणार असल्याचेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.