Share

Vinayak Raut | “मुंबईकरांना वाटलं होतं मोदी झोळी भरुन आणतील, पण…”; विनायक राऊतांची केंद्रावर बोचरी टीका

🕒 1 min read Vinayak Raut | मुंबई : आज केंद्राचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केला आहे. त्यावरुन सत्तधारी विरोधकांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. “केंद्र सरकारने आज देशाचा अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गीयांसह सगळ्यांना मोठं मोठी अश्वासन देण्यापलिकडे या अर्थसंकल्पाने काही केले नाही” अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. शिवसेना … Read more

Published On: 

🕒 1 min read

Vinayak Raut | मुंबई : आज केंद्राचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केला आहे. त्यावरुन सत्तधारी विरोधकांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. “केंद्र सरकारने आज देशाचा अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गीयांसह सगळ्यांना मोठं मोठी अश्वासन देण्यापलिकडे या अर्थसंकल्पाने काही केले नाही” अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी अर्थमंत्री निर्मली सीतारामन यांनी सादर केलेला ‘अर्थसंकल्प हा देशातील नागरिकांच्या तोंडाला पानं फुसणारा आहे’ अशीही टीका केली आहे.

“पंतप्रधान नेरंद्र मोदी सातत्याने मुंबई दौऱ्यावर असतात. त्यामुळे मुंबईच्या जनसामान्यांना हजारो कोटी रुपयांची झोळी भरून मुंबईला येतील असं वाटत होतं मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मात्र मुंबईकरांच्या अपेक्षा मोदी सरकारने धुळीस मिळवल्या आहेत” अशी टीकाही विनायक राऊत यांनी यावेळी केली आहे.

आणखी काय म्हणाले विनायक राऊत?

“केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांबरोबरच कृषीप्रधान असलेल्या देशातील शेतकऱ्यांच्याही तोंडाला पानं पुसली आहेत. देशातील इतर शहरांपेक्ष आणि राज्यांपेक्षा मुंबई आणि महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त रेव्हून्यू दिला जातो. त्यामुळेच राज्यातील आणि मुंबईकरांकडून या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र आता या मोदी सरकारने ना मुंबईला काही दिले आहे ना महाराष्ट्राला काही दिले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून मुंबईकरांच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत” असंही विनायक राऊत यांनी सांगितले आहे.

“पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांचा आकडा हा 11 कोटी 30 लाख एवढा सांगितला जातो, मात्र हा आकडा केंद्र सरकार चुकीचा सांगत आहे. मात्र देशातील फक्त साडेतीन कोटी शेतकऱ्यांनाच याचा फायदा मिळत आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्र, मुंबईकरांबरोबरच देशातील मध्यमवर्गीयांची फसवणूक केंद्र सरकारने केली आहे” असंही विनायक राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या