Eknath Shinde | “हा अर्थसंकल्प गरीबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा”; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान, अर्थमंत्र्यांचं कौतुक

Eknath Shinde | मुंबई : आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala sitaraman) यांनी जाहीर केला. अर्थमंत्री सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून अर्थमंत्री आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली जात आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. त्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

“देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला या अर्थसंकल्पाद्वारे चालना मिळणार आहे, त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मनापासून अभिनंदन करतो.”, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

“रोजगारनिर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पाचे मी राज्याच्यावतीने मनापासून स्वागत करतो.” असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

“देशाच्या अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मांडला. हा अर्थसंकल्प गरीबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी तसेच पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा अर्थसंकल्प आहे.” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button