Nana Patole | “आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ अन् गुलाबी स्वप्नं यापलिकडं अर्थसंकल्पात काही नाही”

Nana Patole | मुंबई : आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala sitaraman) यांनी जाहीर केला, त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदींचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तसेच सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचवणाऱ्या वस्तूंची महागाई यावरुन अर्थसंकल्पामध्ये भाष्य केलं गेलं नसल्याचं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

‘आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलिकडे अर्थसंकल्पात काही नाही’, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

“महागाई, बेरोजगारी, शेतकरी, मनरेगा, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसच्या किंमती शेतमालाला किमान आधारभूत किंमत या ज्वलंत प्रश्नावर चकार शब्द अर्थमंत्र्यांनी काढला नाही. देशातील जनतेची घोर निराशा करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे”, अशी घोणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत असल्याचे आता सर्वत्र पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.