Alovera Benefits | केसांना दाट आणि मजबूत बनवायचे असेल, तर कोरफडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Alovera Benefits | टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला सुंदर आणि दाट केस (Hair) हवे असतात. पण आजकाल खराब जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे केसांच्या समस्या वाढत चालल्या आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी अनेकजण रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. पण ही उत्पादन केसांना हानी पोहचवू शकतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकतात. कोरफडीचा वापर केल्याने केस नैसर्गिक पद्धतीने दाट आणि मजबूत होऊ शकतात. केसांची निगा राखण्यासाठी कोरफडीचा पुढील प्रमाणे वापर करा.

कोरफड हेअर मास्क

केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही कोरफडीचा हेअर मास्क वापरू शकतात. यासाठी तुम्हाला अर्धी वाटी मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे दाणे बारीक करून घ्यावे लागेल. त्यानंतर त्यामध्ये तीन चमचे एलोवेरा जेल मिसळून घ्यावा लागेल. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला एक तास केसांवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे  लागेल. या मिश्रणाचा तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापर करू शकतात. या मिश्रणाच्या वापराने केस दाट आणि मजबूत होऊ शकतात.

कोरफड आणि आवळा

कोरफड आणि आवळ्याच्या मदतीने केस मजबूत आणि दाट होऊ शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचा एलोवेरा जेलमध्ये दोन चमचे आवळ्याचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते केसांना आणि टाळूवर अर्धा तास लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा नियमित शाम्पूने धुवावा लागेल. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकतात.

कोरफड आणि एरंडेल तेल

कोरफड आणि एरंडेल तेल केसांची निगा राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला दोन चमचे कोरफडीमध्ये एक चमचा एरंडेल तेल आणि एक चमचा मेथी पावडर मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते केसांवर लावावे लागेल. एक तास हे मिश्रण डोक्यावर ठेवल्यानंतर तुम्हाला तुमचे केस नियमित शाम्पूने धुवावे लागेल. तुम्ही या मिश्रणाचा आठवड्यातून दोन वेळा वापर करू शकतात. या मिश्रणाच्या वापराने केस लांब आणि मजबूत होण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.