Budget 2023 | मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त?; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2023 | नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने मोदी सरकारचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा येणाऱ्या अनेक मोठ्या घोषणा केल्या असल्याचं पाहायला मिळतंय.

या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकारने स्मार्टफोनवरील सीमा शुक्लात कपात केली आहे. तसेच, स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या लिथियम बॅटरीच्या सीमा शुल्कातही कपात करण्यात आली आहे.

स्मार्टफोनमधील कॅमेरा लेंसच्या सीमा शुक्लात २.५ टक्क्यांनी कपात केली. तसेच, एलईडी टीव्हीच्या सीमा शुक्लातही २.५ टक्क्यांनी कपात करण्यात आल्याचं सीतारमण यांनी सांगितलं.

शेतीसाठी डिजिटल पायाभूत सुविधांना चालना, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न, क्षमतांचा पूर्ण वापर, शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करण्याचे प्रयत्न, आर्थिक क्षेत्र आणि युवक विशेष लक्ष यावर अधिक भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कोणत्या वस्तू स्वस्त होणार?

-कॅमेरा लेन्स आणि लीथियम आयन बॅटरी यांसारख्या मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवरील कस्टम ड्युटी कमी असेल.

-टेलीव्हिजन पॅनलमध्ये वापरण्यात येणाऱ्या काही उपकरणांवरही कस्टम ड्युटी असणार नाही.

-प्रयोगशाळेत बनवण्यात येणाऱ्या हिऱ्यांच्या बीजावर कस्टम ड्युटी कमी असेल, त्यामुळे त्याची किंमतही कमी होईल.

-तांब्यावर लावण्यात आलेली 2.5 टक्के कस्टम ड्युटी बदलण्यात येणार नाही.

-डिनेचर्ड इथाईल अल्कोहोल कस्टम ड्युटीमधून हटवण्यात येईल.

-क्रूड ग्लिसरिनवर लावण्यात आलेली कस्टम ड्युटी 7.5 वरून 2.5 वर आणली जाईल.

-समुद्री व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी झिंग्यावरील आयात दर कमी करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.