IND vs AUS | कसोटी मालिकेतून श्रेयस अय्यर बाहेर, तर ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लवकरच कसोटी सामने सुरू होणार आहे. नऊ फेब्रुवारी रोजी या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे पार पडणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यातून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. न्युझीलँडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमधून श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. आता पुन्हा एकदा तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. NCA ने त्याला किमान दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अय्यरच्या अनुपस्थितीमध्ये निवड समिती सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला कसोटी पदार्पण करण्याची संधी देऊ शकते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी श्रेयस अय्यर तंदुरुस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रेयस सध्या बंगलोरमध्ये राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये उपचार घेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनेक इंजेक्शन घेतल्यानंतरही श्रेयसला पाठीच्या दुखापतीतून आराम मिळत नाहीये. त्यामुळे त्याला किमान दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेमध्ये श्रेयस सहभागी होऊ शकत नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसची दुखापत अद्याप बरी झालेली नाही. त्यामुळे त्याला दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचा फिटनेस पाहून त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये खेळायची संधी मिळू शकते.

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीमध्ये सूर्यकुमार यादवला कसोटी संघात संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादवने टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला कसोटी मालिकेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या