Share

Skin Care Tips | मुलतानी माती आणि खोबरेल तेलाचा फेसपॅक लावल्याने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेची काळजी घेण्यासाठी मुलतानी माती आणि खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे. या दोन्ही गोष्टी त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी आहेत. यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे नियमित याच्या वापराने त्वचा निरोगी राहू शकते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही मुलतानी माती आणि खोबरेल तेलाचा फेसपॅक वापरू शकता. हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये एक चमचा मुलतानी माती आणि दोन चमचे खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. तयार झालेल्या या मिश्रणामध्ये तुम्हाला कच्चे दूध किंवा गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. ही पेस्ट गुळगुळीत झाल्यावर तुम्हाला ती दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या फेसपॅकचा वापर केल्याने तुम्हाला पुढील फायदे मिळू शकतात.

चेहऱ्यावरील काळेपणाची समस्या दूर होते

खोबरेल तेल आणि मुलतानी मातीच्या फेसपॅकचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरील काळेपणा दूर होऊ शकतो. हा फेसपॅक चेहऱ्यावरील टॅनिंग, प्रेग्नेंटेशन आणि काळे डाग दूर करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे तुम्ही जर चेहऱ्यावरील काळ्या डागांच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर तुम्ही या फेसपॅकचा वापर करू शकतात.

मुरुमांची समस्या कमी होते

खोबरेल तेल आणि मुलतानी मातीच्या फेसपॅकचा वापर केल्याने त्वचा निरोगी राहते. त्याचबरोबर या फेसपॅकचे नियमित वापराने त्वचेवरील मुरुमांची जळजळ कमी होऊन त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर या फेसपॅकच्या मदतीने चेहऱ्यावरील चट्टे देखील दूर होऊ शकतात.

कोरड्या त्वचेची समस्या कमी होते

मुलतानी माती आणि खोबरेल तेलाच्या मदतीने त्वचेवरील कोरडेपणाची समस्या दूर होऊ शकते. हा फेसपॅक लावल्याने त्वचेत ओलावा टिकून राहतो. परिणामी त्वचा मुलायम आणि चमकदार राहते. त्यामुळे तुम्ही जर त्वचेच्या कोरडेपणाच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर तुम्ही या फेसपॅकचा वापर केला पाहिजे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेची काळजी घेण्यासाठी मुलतानी माती आणि खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे. या दोन्ही …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now