Share

Suryakumar Yadav: नीशमने टीम इंडियाची कंबर मोडली! कॅप्टन सूर्या फायनलमध्ये झिरोवर आऊट

अहमदाबादमध्ये जेम्स नीशमने टीम इंडियाला एकापाठोपाठ मोठे धक्के दिले असून, कॅप्टन सूर्यकुमार यादव अवघ्या शून्यावर बाद झाल्याने चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.

Published On: 

Suryakumar Yadav Post: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर 'ती' पोस्ट व्हायरल!

🕒 1 min read

Suryakumar Yadav: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर धावांचा पाऊस पडत असतानाच, जेम्स नीशम नावाच्या वादळाने भारतीय फलंदाजी अक्षरशः उद्ध्वस्त केली आहे. अवघ्या १० चेंडूंच्या फरकात टीम इंडियाने आपले ३ सर्वात मोठे फलंदाज गमावले आहेत.

संजू सॅमसन आणि ईशान किशनला एकाच ओव्हरमध्ये बाद केल्यानंतर, नीशमने १७ व्या षटकात पुन्हा एकदा मोठा धमाका केला. त्याने टीम इंडियाचा सर्वात मोठा हुकमी एक्का आणि कर्णधार सूर्यकुमार यादवलाही तंबूत पाठवले आहे.

१ लाख ३२ हजार प्रेक्षकांना सूर्याकडून एका कॅप्टन्स नॉकची अपेक्षा होती. पण तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. सूर्या अवघ्या एका चेंडूचा सामना करत शून्यावर (०) बाद झाला आहे. नीशमच्या गोलंदाजीवर रचिन रवींद्रकडे झेल देऊन तो निराश मनाने पॅव्हेलियनमध्ये परतला.

नीशमने फायनलमध्ये खऱ्या अर्थाने गेम फिरवला आहे. त्याने आपल्या २ षटकांत फक्त १३ धावा खर्च करून ३ अतिशय महत्त्वाचे बळी घेतले आहेत. १६.३ षटकांनंतर भारताची धावसंख्या आता ४ बाद २०७ अशी झाली आहे.

सध्या मैदानावर हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा ही नवी जोडी फलंदाजी करत आहे. भारताचा धावांचा वेग जो १४ च्या घरात होता, त्याला आता अचानक मोठा ब्रेक लागला आहे. आता उरलेल्या २० चेंडूंत हार्दिक पंड्या काही चमत्कार करतो का? याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!