Narayan Rane | “येत्या वर्षात भारताची अर्थव्यवस्था जर्मनी अन् जपानपेक्षा मोठी असेल” – नारायण राणे

Narayan Rane | नवी दिल्ली :  आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala sitaraman) यांनी जाहीर केला, त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

विरोधकांकडून यावर टीका करत नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पावर आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं असून काही वर्षात भारत जर्मनी-जपानला मागे टाकेल, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

“या अर्थसंकल्पाला मी सर्वंकष अर्थसंकल्प म्हणेन की ज्यामध्ये देशाच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे. जागतीक पातळीवर देश तिसऱ्या क्रमांकावर जावा एवढी अर्थव्यवस्था सुधारली जावी, अशी पावलं उचलण्यात आली आहेत. त्यामुळं काही वर्षात भारत जर्मनी आणि जपानलाही मागे टाकेल”, असं नारायण राणे यांनी म्हंटल आहे.

उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीसाठी तरतूद केली जाते पण मुंबईसाठी काही तरतूद केलेली नाही? असं विचारताच  राणे म्हणाले, मुंबईसाठी आम्ही तरतूद करायला लावू, मुंबईसाठी कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे पाहिजे ते आम्ही उपलब्ध करु आणि आमचं ते ऐकतील एवढा मला विश्वास आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.