Narayan Rane | पेट्रोल, गॅस दरवाढीबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे नारायण राणे पत्रकारांवर भडकले; म्हणाले, “तुम्ही…”

Narayan Rane | मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. आजच्या अर्थसंकल्पामध्ये महागाईबाबत विशेष तरतुद करण्यात आली नसल्याने नारायण राणेंच्या पत्रकर परिषदेमध्ये पत्रकारांनी पेट्रोल आणि गॅस सिलिंडर दरवाढीवरून प्रश्न विचारल्यानंतर नारायण राणेंनी पत्रकारांवर चांगलेच भडकल्याचे पहायला मिळाले. नारायण राणेंनी पत्रकारांना थेट ‘शिवसेनेचे प्रवक्ते’ म्हटलं. यानंतर पत्रकार आणि नारायण राणेंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळालं आहे.

सर्व सामान्यांना पेट्रोल, गॅस दरवाढीवर दिलासा मिळण्याची अपेक्षा यावर प्रश्न विचारला असता नारायण राणे म्हणाले, “तुम्ही पत्रकार नाही, तर सोशल वर्कर झाला आहात किंवा शिवसेनेचे प्रवक्ते झाले आहात.” यावर पत्रकारांनी आक्षेप घेतला. तसेच प्रश्न विचारल्याने कोणी प्रवक्ते होत नाही. प्रश्न विचारणं आमचं काम आहे, असं पत्रकारांनी स्पष्टपणे सुनावल्याच पाहायला मिळालं आहे.

काय नारायण राणे म्हणाले?

“अर्थसंकल्प पूर्ण वाचा. अर्थसंकल्प खूप मोठा आहे आणि मी प्रत्येक गोष्टीवर सविस्तर सांगू शकत नाही. सविस्तर माहिती घेता येईल म्हणून मी पत्रकार परिषद सायंकाळी पाच वाजता घेतली. प्रत्येक तरतूद सांगता येणार नाही. एखाद्या लोकप्रतिनिधीशी बोलताना तुम्ही ग्राह्य धरता हे काय आहे. तुम्ही जे बोलला त्याचा अर्थसंकल्पाशी काय संबंध आहे?”, असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे.

अहमदाबादसाठी तरतूद होते, मात्र मुंबईसाठी तरतूद होत नाही यावर विचारलं असता नारायण राणे म्हणाले, “आम्ही मुंबईसाठी तरतूद करत आहोत आणि करायला लावू. मुंबईला कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे लागले तर आम्ही ते उपलब्ध करून देऊ. ते आमचं ऐकतील एवढा आम्हाला विश्वास आहे.”, असे नारायण राणेंनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.