Share

Job Vacancies | एअर इंडिया सर्विस लिमिटेडमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min read Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारीबद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे अनेक संस्था रोजगार संधी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिस लिमिटेड (AIATSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यासाठी अर्ज मागविण्यात … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारीबद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे अनेक संस्था रोजगार संधी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिस लिमिटेड (AIATSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिट यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 166 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये एजंट सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हॅंडीमॅन पदांच्या रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी http://www.aiasl.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 7 ते 13 फेब्रुवारी दरम्यान मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

या मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना हॉटेल प्रिस्टाइन रेसिडेन्सी, विमानतळ रोड, एसव्हीपी इंटरनॅशनलच्या समोर, सरदारनगर, हंसोल, अहमदाबाद, गुजरात, पिनकोड- 382475 या पत्त्यावर पोहोचावे लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.aiasl.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Job Education

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या