Nitin Deshmukh | “नारायण राणे आणि नितेश राणेंचा चेहरा पाहिला तरी महाराष्ट्रायीन सोडा हिंदुस्थानीही वाटत नाही”

Nitin Deshmukh | मुंबई :  भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हाडा वसाहतीतील कार्यालयावरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर टीका केली. “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही. उद्धव ठाकरे हे ना *** आहेत. त्यांना अनिल परबांसारखे कारकून लागतात”, असे ते म्हणाले होते. त्यावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“नारायण राणे आणि नितेश राणेंचा चेहरा पाहिला तरी महाराष्ट्रायीन सोडा हिंदुस्थानीही वाटत नाही. वारंवार चुकीच्या पद्धतीने बोलत असतात. नितेश राणे स्वत:लाच साहेब म्हणतात. हे भाजपचे तळवे चाटत आहेत. काँग्रेसमध्ये तळवे चाटून महसूलमंत्रिपद मिळवले. आता तळवे चाटल्याने केंद्रात मंत्री केले”, असे नितीन देशमुख (Nitin Deshmukh) म्हणाले.

नितेश राणेंचं वक्तव्य काय?

“दुसऱ्यांची घरं पाडण्यासाठी तक्रारी देणाऱ्या लोकांबरोबर नियती कधी ना कधी असा खेळ करतेच. कधी राणे साहेबांचं घर तोडा, कधी कंगना रणावतचं घर तोडा, कधी दुसऱ्यांना अटक करायला लावा अनिल परब हा मातोश्रीचा कारकून आहे. उद्धव ठाकरेंना स्वत:ला काही करण्याची हिंमत नाही. कारण तो नामर्द आहे. त्याला अनिल परबसारखे कारकून लागतातच”, अशा एकेरी भाषेत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

अनिल परबचं घर फक्त ‘झाकी है अभी मातोश्री टू बाकी है’ दुसऱ्या मातोश्रीवर जेव्हा हतोडा पडेल तेव्हा दिसेल. कारण त्यामध्ये सुद्धा खूप अनधिकृत गोष्टी आहेत. राणे साहेबांच्या घरावर तक्रार करण्याआधी तुझा जो बाप आहे उद्धव ठाकरे त्याच्या मातोश्री टूमध्ये जे आता नवीन तयार झालं आहे त्यामध्ये शिल्लक सेनेच्या शिवसैनिकांना एन्ट्री नाही”, असंही नितेश राणे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.