Ajit Pawar | “केंद्राला सर्वात जास्त पैसा महाराष्ट्रातूनच, मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी १ फेब्रुवारी बुधवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

“मोदी सरकारकडून नऊ राज्यांना डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. आगामी काळात कर्नाटकच्या निवडणुका आहेत, तिथे साडेतीन हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. याच कर्नाटक राज्याला लागून महाराष्ट्र आहे. मग महाराष्ट्रालासुद्धा तेवढे पैसे द्यायला हवे होते”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

केंद्र सरकारला महाराष्ट्रातून सर्वात जास्त पैसा मिळतो. अशा वेळी केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिकचे पैसे दिले पाहिजे. आज मुंबईत अनेक प्रश्न आहेत. मेट्रो, वाहतूक, झोपडपट्टी आदी प्रश्न आज प्रलंबित आहेत. इथे नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या हिताची कोणतीही घोषणा झाली नाही”, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

“मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला”

“मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे असेही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेचं कौतुकही केलं. मोदी सरकारने मागे जाहीर केलं होतं. शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याबाबत अधिकचा भाव दिला असताना त्याला आयकर लावला होता. ही कर लावू नये अशी मागणी होती. बरीच वर्ष हे प्रकरण चालू होतं. कालच्या अर्थसंकल्पानंतर हे प्रकरण निकाली निघालं. या गोष्टीचं समाधान आहे”,असेही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या