MLC Election Result । बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; नागपुरात ‘मविआ’चे सुधाकर अडबाले विजयी

MLC Election Result । नागपूर : विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागतोय. कोकणात भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे.

आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 28 हजार मतांची मोजणी झालेली आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. एकूण ७ हजाराहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर आहेत. आतापर्यंत 14 हजार मतांचा लीड म्हणजे अडबालेंच्या विजयाची खात्री दिली जात आहे.

गेली 12 वर्षे येथे आमदार म्हणून नागोराव गाणार होते आणि आताही हा मतदारसंघ भाजपचाच बालेकिल्ला असल्याचं म्हंटल जातं. पण आजचा निकाल अडबालेंच्या बाजूने लागल्याने पदवीधरप्रमाणे भाजपचा हा गड महाविकासआघाडीने जिंकला आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीतही भाजपला विजयाची पूर्ण खात्री होती. तिथं त्यांना पराभव पत्करावा लागला. आज त्याची पुनरावृत्ती होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :