Deepak Kesarkar | सत्यजीत तांबेंना भाजपकडून आलेल्या ऑफरवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Deepak Kesarkar | मुंबई : शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची आज राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. भाजपकडून सत्यजीत तांबेंना पक्षप्रवेशाची खुली ऑफर आल्यानंतर या चर्चेला चांगलाच जोर आला आहे. याविषयी आता शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपकडून ऑफर

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजीत तांबेंनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत सूचक विधान केलं होतं. “सत्यजीतचा विजय निश्चित आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह राहणारच आहे”, असं म्हणत सत्यजीत तांबेंना राधाकृष्ण विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

दीपक केसरकरांनी सत्यजीत तांबेंच्या विजयाची खात्री व्यक्त करतानाच त्यांच्या भाजप प्रवेशामध्ये येणाऱ्या नियमाची अडचण स्पष्ट केली. “सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार नाहीत. मी एवढंच सांगितलं की तांबे कुठल्या पक्षात गेलेले नाहीत. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज केला आहे ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा तुम्ही विधान परिषदेत अपक्ष म्हणून राहता, त्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षात जाऊ शकत नाहीत. तुम्ही एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊ शकता. सत्यजीत तांबे निवडून येतील अशी मला १०० टक्के खात्री आहे”, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

दरम्यान, आजच्या निवडणूक निकालातून कोकणात भाजपने विजयाचा नारळही फोडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या