Chandrashekhar Bawankule | “नागपूरात आमचा उमदेवार असता तर आम्ही जिंकलो असतो”; बावनकुळेंचं वक्तव्य

Chandrashekhar Bawankule | मुंबई : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत या निवडणुकीत भाजपने पाठिंबा दर्शवलेल्या ना. गो. गाणार यांचा पराभव झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे.  नागपूर भाजपचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

“ती जागा गेली याला काही भाजपचं अपयश नाही म्हणता येणार. भाजपचा एबी फॉर्म नाही, भाजपचा उमेदवार नाही. जर भाजप उमेदवार असता तर अजून काही वेगळं चित्र असतं. त्यामुळे मला वाटतं, यावर हुरळून जाण्याची काही गरज नाही.”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

“कोकणमध्ये आम्ही जिंकलो आहोत. सत्यजित तांबेही आघाडीवर आहेत, त्यांनाही आम्ही समर्थन दिलं होतं. मराठवाड्यातील जागेवर विक्रम काळे यांच्या मतांचा फरक बघा, मागीलवेळी ते कुठे होते आणि आता ते कुठे आले आहेत? १४ हजारांच्यावर मतं आम्ही घेतली आहेत. मागीलवेळी आम्ही हजार, दीड हजार मतंच घ्यायचो. हे निकाल भाजपने आत्मपरीक्षण करावं, असे नाहीत. खरंतर मराठवाड्यात ती जागा राष्ट्रवादीकडेच होती”, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडीकडे होती, नाशिकची जागाही महाविकास आघाडीकडे होती. नागपुरची जागा मात्र शिक्षक परिषदेची होती ती भाजपची नव्हती, भाजप जर स्वत: लढली असतं तर मला वाटतं काहीतरी वेगळं चित्र असतं. अमरावतीमध्ये मात्र अजूनही पूर्ण मोजणी व्हायची आहे. रणजित पाटील हजार-बाराशे मतांनीच मागे आहेत, मला वाटतं वाट बघायला हरकत नाही. नागपुरमध्ये भाजपचा उमदेवार असता तर आम्ही जिंकलो असतो.” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.