Share

Gulabrao Patil | “आमच्या सगळ्या छुप्या गोष्टी बाहेर येत आहेत”; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

🕒 1 min read Gulabrao Patil | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटासह महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटकपक्षांनी संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवली आहे. मात्र, काँग्रेसमध्ये बंडखोरीही पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीसांना मविआतून छुपी मदत मिळाल्याचीही चर्चा आहे. याविषयी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Gulabrao Patil | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटासह महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटकपक्षांनी संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवली आहे. मात्र, काँग्रेसमध्ये बंडखोरीही पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीसांना मविआतून छुपी मदत मिळाल्याचीही चर्चा आहे. याविषयी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली आहे.

“कुणी कितीही आरडाओरडा केला, कल्लोळ केला, तरी जनता आमच्या पाठिशी आहे हे सिद्ध झालं. हा आमचा पहिला विजय आहे आणि आमची बोहणी झाली आहे. त्यामुळे पुढे आमचं चांगलं काम होईल”, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. त्यानंतर ‘महाविकासआघाडीतून तुम्हाला छुपी मदत झालीय का?’ असा प्रश्न विचारताच “आता आमच्या सर्व छुप्या गोष्टी बाहेर येत आहेत. त्या गोष्टी यापुढेही येतील.”, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

“जनता कुणाबरोबर आहे हे पदवीधर लोकांनी दाखवून दिलं आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतं आहे. त्यावर शेतकरी खूश आहेत. दुसरीकडे शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी शिक्षकांसाठी चांगले निर्णय घेतले. त्यावर शिक्षक खूश आहेत. आता पदवीधरांचं मन कुठं आहे हे निकालातून दिसत आहे.”, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही