Amol Mitkari | “संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी, अन्…”; नागपूर निकालानंतर मिटकरींचा भाजपला मार्मिक टोला

Amol Mitkari | मुंबई : भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूरमध्ये विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने भाजपला जोराचा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांनी भाजपने पाठिंबा दिलेले शेकापचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने विजय मिळवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना रंगत आली आहे. नागपूरमधील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नागपूरच्या स्थानिक राजकारणावरून समर्पक चारोळी शेअर करत भाजपला खोचक टोला लगावला आहे.

अमोल मिटकरींनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आगामी काळात महाराष्ट्रात भाजपची धुरा नितीन गडकरी सांभाळतील का?” असा सवाल मिटकरी यांनी विचारला आहे. मिटकरींनी याबाबतचे ट्वीट केले आहे.

अमोल मिटकरी यांनी भाजपचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही टोला लगावला आहे. अमोल मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “नागपूरकर ‘गाणार’… आज ‘कमळाबाई’ जाणार… बावन’कुळां’चा उद्धार… काही दिवसांत होणार… संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी… नितीनजी ठरतील का भावी “गड”करी?”, असे अमोल मिटकरी हे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.