Aadhaar-Pan Link | फक्त एका मेसेजच्या मदतीने आधार-पॅन कसे लिंक करायचे? जाणून घ्या

Aadhaar-Pan Link | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नागरिकांसाठी पासपोर्ट जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढेच महत्त्वाचे आहे आधार कार्ड (Adhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card). आधार कार्ड हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, तर तुमची अनेक कामे खोळंबु शकतात. त्याचबरोबर सरकारी कामांसाठी आणि आर्थिक बाबींसाठी पॅन कार्ड खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आधार-पॅन लिंक (Aadhaar-Pan Link) असणे खूप महत्त्वाचे आहे. ही कागदपत्र लिंक करण्यासाठी सरकारने नागरिकांना 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. तुम्हाला माहित आहे का? तुम्ही फक्त एका मेसेजच्या मदतीने आधार-पॅन लिंक करू शकतात. त्यासाठी तुम्हाला पुढील पद्धती फॉलो कराव्या लागतील.

SMS च्या माध्यमातून आधार-पॅन लिंक (Aadhaar-Pan Link) करा

  • सर्वप्रथम तुम्हाला UIDPAN फॉरमॅटमध्ये मेसेज टाईप करावा लागेल. त्यानंतर तो मेसेज तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 56161 किंवा 567678 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
  • 56161 किंवा 567678 या क्रमांकावर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक टाईप करून पाठवावा लागेल.
  • मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला आधार-पॅन लिंक करण्याबाबत एक कन्फर्मेशन मेसेज येईल.
  • हा मेसेज मिळाल्यानंतर तुमचे आधार-पॅन लिंक झालेले असेल.

ई-फायलिंग पोर्टल द्वारे आधार-पॅन लिंक करा ( Aadhaar-Pan Link Marathi News )

  • ई-फाइलिंग पोर्टलद्वारे आधार-पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला या https://incometaxindiaefiling.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी तुमचा पॅन क्रमांक तुमचा यूजर आयडी असेल.
  • यूजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला एक पॉप-अप विंडो दिसेल, जिथे तुम्हाला आधार-पॅन लिंक करण्यासाठी पर्याय उपलब्ध असेल.
  • ही विंडो दिसत नसल्यास, मेनूबारवरील प्रोफाइल सेटिंगवर जाऊन ‘लिंक आधार’वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आधार आणि पॅन तपशील दिसतील. तुम्हाला हे तपशील व्हेरिफाय करावे लागतील.
  • व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करून ‘आता लिंक करा’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पॉप-अप मेसेजद्वारे तुम्हाला तुमची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची कळेल.

परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. आयकर कायदा 1961 च्या कलम 139AA नुसार, जर तुमचे आधार-पॅन लिंक नसेल, तर ते 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय होईल.

महत्वाच्या बातम्या