Rain Alert | राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता, तर ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rain Alert | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये जानेवारी महिन्यात थंडी (Cold) चा जोर मोठ्या प्रमाणात होता. तर जानेवारी महिन्याच्या शेवटी राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली होती. अशा परिस्थितीत राज्यातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, फेब्रुवारी महिन्यात देशात बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता (Rain Alert ) वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी गारवा राहणार आहे.

हवामान अंदाजानुसार, आज (3 फेब्रुवारी) उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर भारतामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. लडाख, जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात येत्या 24 तासात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, या बदलत्या हवामानाचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. या वातावरणामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या वातारणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे, आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या