Sanjay Raut | “लोकांनी भाजपाला नापास केलंय, त्यामुळे उगाच फालतू…”; संजय राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, तरीही भाजपकडून विजयाचे दावे केले जात आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे.

नागपूर, औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे उमेदावर निवडून आले आहेत. तर, अमरावतीत अद्यापही मतमोजणी सुरु असून, भाजपाचा उमेदवार पिछाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील उच्च, मध्यमवर्गीय सुशिक्षित आणि पदविधर मतदारांनी भाजपाचा पराभव केला आहे. भाजपाला नाकारलं असून, नापास केलं आहे.”

त्याचबरोबर “विधान परिषदेच्या पाचपैकी फक्त एका जागेवर भाजपाचा विजय झाला आहे. तो पण एक उमेदवार उधार-उसणेवारीचा आहे”, असा खोचक टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला. कोकणची जागा शेकापची होती. शिवसेनेकडे असती तर वेगळा निकाल लागला असता, असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील उच्च मध्यमवर्गीय, पदवीधरांनी भाजप आणि त्यांच्या सरकारचा पराभव केला आहे. भाजपने उगाच फालतू खुलासे करू नये. महाराष्ट्रात जे चाललंय हे लोकांना मान्य नाही. लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक निवडणूक एकीने आणि मजबुतीने लढत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.