Hills Station | हिल्स स्टेशन ट्रिप प्लान करत आहात? तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Hills Station | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये अनेक सुंदर हिल स्टेशन आहे. यामध्ये हिमालय पर्वतरांगेपासून सह्याद्री पर्वतरांगेपर्यंत अनेक शिखरांचा समावेश आहे. निसर्गसौंदर्याचा जवळून आनंद घेण्यासाठी लोक या हिल स्टेशनला भेट देतात. कारण डोंगरांवरून निसर्गाचे सर्वोत्तम नजारे बघायला मिळतात. त्यामुळे तुम्ही पण जर निसर्गाचे सर्वोत्तम नजारे बघण्यासाठी हिल स्टेशनला जाण्याची प्लॅनिंग करत असाल, तर तर तुम्ही योग्य बातमी वाचत आहात. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतातील काही उत्कृष्ट हिल स्टेशनबद्दल माहिती सांगणार आहोत. तुम्ही पुढील हिल स्टेशनला भेट देऊ शकतात.

चैल

चैल हे हिमाचल प्रदेशमध्ये स्थित असलेले एक छोटेसे हिल स्टेशन (Hills Station) आहे. हे एक अतिशय शांत ठिकाण आहे. या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. चैलमध्ये फारशी गर्दी नसते. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमची सुट्टी निवांत साजरी करू शकतात.

डेहरादून

डेहरादून ही उत्तराखंडची राजधानी आहे. डेहराडून हे ठिकाण गंगा-यमुना नदीने वाढलेले आहे. डेहराडूनला दून व्हॅली म्हणून देखील ओळखले जाते. डेहरादूनमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक उंच शिखर (Hills Station) बघायला मिळतील. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही टपकेश्वर मंदिर, लचिवाला, राजाजी नॅशनल पार्क इत्यादी स्थळांना भेट देऊ शकतात.

औली

औली हे उत्तराखंडमधील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन (Hills Station) आहे. या ठिकाणाला भेट द्यायला देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. औलीमधील केबल कार राईड जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला हिमालय पर्वतरांगेचे सर्वोत्कृष्ट नजारे बघायला मिळतील.

गंगटोक

सिक्कीम राज्यातील गंगटोक हे सर्वात मोठे शहर आहे. या ठिकाणी तुम्हाला ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, हायकिंग इत्यादी गोष्टींचा आनंद घेता येऊ शकतो. गंगटोकमध्ये निसर्गच्या सानिध्यात तुम्हाला तुमची सुट्टी आरामात साजरी करता येऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.