बिडकीन DMIC: स्वतःचा एखादा मोठा उद्योग थाटायचाय? की आलिशान घर बांधण्याचं स्वप्न आहे? तर मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीत पुन्हा एकदा मोठी संधी चालून आलीये.
महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मर्यादितने (MITL) बिडकीन आणि शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील तब्बल ४१ भूखंडांसाठी ई-लिलावाची अधिकृत जाहिरात काढली आहे. याआधी एप्रिलमध्ये झालेल्या लिलावाला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता, यंदाही गुंतवणूकदारांची मोठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.
AURIC Plot Auction: बिडकीनमध्ये ३० तर शेंद्रात ११ भूखंडांची विक्री
सध्या डीएमआयसीच्या (DMIC) बिडकीन इंडस्ट्रीयल झोनमध्ये तब्बल ३० भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेत. यात एमएसएमई (MSME) उद्योगांसाठी १३, तर फूड पार्कसाठी ६ भूखंड राखीव आहेत. यातील काही भूखंड अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) प्रवर्गासाठीही राखीव ठेवण्यात आले आहेत.
व्यावसायिक आणि निवासी वापराचा विचार करता, बिडकीनमध्ये प्रत्येकी चार भूखंड उपलब्ध आहेत. याशिवाय हॉटेल, पेट्रोलपंप (किंवा सीएनजी सेंटर) आणि एका उच्च माध्यमिक शाळेसाठी जागा प्रस्तावित आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर आगामी काळात चांगलाच गजबजणार आहे.
दुसरीकडे, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतही ११ भूखंड ई-लिलावासाठी ठेवण्यात आले आहेत. यात दोन व्यावसायिक आणि सात निवासी भूखंड आहेत. सोबतच नागरिकांच्या सुविधेसाठी एक मोठं रुग्णालय आणि सामुदायिक खरेदी केंद्रासाठी प्रत्येकी एक भूखंड राखीव आहे.
मागच्या वेळी एप्रिलमध्ये याच भागात लिलाव झाला होता. त्यावेळी काही भूखंडांना थेट १० हजार ५०० रुपये प्रति चौरस मीटरचा विक्रमी दर मिळाला होता. हा दर मूळ दराच्या चक्क अडीच पट होता! त्यामुळे यावेळचा लिलावही रंगतदार ठरणार आहे. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून, ४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- नेपाळवर पुन्हा महाप्रलयाचं संकट! 72 तासांत बॅरिअर लेक फुटण्याचा चीनचा इशारा
- बोगस कामगार घोटाळा: मजुरांच्या घामावर दलालांचा डल्ला! बिडकीन बनले केंद्रबिंदू
- ‘आरक्षण हटाव’ व्हिडिओप्रकरणी कराळे मास्तरांना अटक; वर्ध्यात खळबळ
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









