Siddharth-Kiara Wedding | जैसलमेर: सध्या सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहे. या चर्चा अफवा असल्याचे सांगितले जात होतं. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. या दोघांच्या लग्नाबाबत एक मोठी गोष्ट समोर आली आहे. या दोघांच्या लग्नात शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मोठा वाटा असणार आहे.
सिद्धार्थ-कियारा (Siddharth-Kiara Wedding) हे दोघे सहा फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहे. या दोघांच्या लग्नासाठी खास सिक्युरिटीचे आयोजन करण्यात आले आहे. या सिक्युरिटीची जबाबदारी शाहरुख खानचा आधीचा बॉडीगार्ड यासीन खान सांभाळणार आहे. यासीन खान सूर्यगड पॅलेसमध्ये कडक सुरक्षा तैनात करणार आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी 6 फेब्रुवारीला लग्नगाठ (Siddharth-Kiara Wedding) बांधणार आहे. 5 फेब्रुवारीपासून या दोघांचे लग्न आधीचे सोहळे पार पडणार आहे. यामध्ये हळद, मेहंदी, साखरपुडा यांचा समावेश असेल. या दोघांचा लग्न सोहळा 100 ते 125 पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. सूर्यगड पॅलेसमधील लक्झरी व्हीला पाहुण्यांसाठी बुक करण्यात आला आहे. 4 फेब्रुवारीपासून सूर्यगड पॅलेसमध्ये पाहुणे पोहोचायला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत आहे. ‘शेरशाह’ चित्रपटामध्ये हे दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर या दोघांची फॅन फॉलोविंग खूप वाढली होती. ही जोडी त्यानंतर कायम चर्चेत आहे. कियारा अडवणी शेवटी ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसली होती. तर सिद्धार्थचा ‘मिशन मजनू’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीपी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Holiday Destinations | निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी साजरी करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम पर्याय
- UPSC Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! यूपीएससीमार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
- Sanjay Raut | “लोकांनी भाजपाला नापास केलंय, त्यामुळे उगाच फालतू…”; संजय राऊतांचा खोचक टोला
- Oily Skin | तेलकट त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- IND vs AUS | चाहत्यांसाठी खुशखबर! भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका बघता येणार मोफत