Vijay Wadettiwar | एकमेकांच्या फाईल आडवा आणि जिरवा, असं सत्ताधारी करताय – विजय वडेट्टीवार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अमित शाहांची भेट घेतली असल्याचं देखील बोललं जात होतं. अशात या मुद्द्यावर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

20 ministers are pitted against each other in the state government – Vijay Wadettiwar

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार  ( Vijay Wadettiwar ) म्हणाले, “सध्या राज्य सरकारमध्ये 20 मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.

हे मी  ( Vijay Wadettiwar ) लवकरच सर्वांसमोर मांडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तिघांचीही दिशा वेगवेगळी आहे.

या तिघांना दिल्लीची हाय कमांड समजून सांगते. मात्र, तरी देखील हे तिघे एकमेकांच्या समोर येणं टाळत आहे. एकमेकांच्या फाईल आडवा आणि जिरवा, असा उद्योग सत्ताधारी करत आहे.”

दरम्यान, अंतरवाली सराटी येथून तीन लोकांना अटक करण्यात आलेली आहे. यावेळी बोलत असताना विजय वडेट्टीवार  ( Vijay Wadettiwar ) यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ते  ( Vijay Wadettiwar ) म्हणाले, “तो सर्वस्वी सरकारचा निर्णय आहे. यामध्ये चुकीचं काही घडत असेल तर कोणीही त्याचं समर्थन करू नये.

तिकडे मराठा समाजाच्या लोकांसह अनेक पोलीस बांधव जखमी झाले होते. त्यामुळे या मुद्द्यांची न्यायाधीशामार्फत चौकशी होणे अपेक्षित आहे.  हा लाठी चार्ज कुणामुळे झाला? गृह खात्याने याबाबत स्पष्टता आणावी.”

महत्वाच्या बातम्या