‘इथे १५ दिवस रक्ताचा वास येत होता…’; अधिकाऱ्यांसमोर जरांगे पाटील भावूक, सरकारला अल्टिमेटम!

आंतरवाली सराटीत जालन्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा करताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले. लाठीचार्जची आठवण सांगत त्यांनी सरकारला थेट जीआर काढण्याचा अल्टिमेटम दिला.

Published On: 

Manoj Jarange gets emotional while talking to Jalna Collector during hunger strike in Antarwali Sarati

Manoj Jarange: बरोबर एक वर्षापूर्वी आंतरवाली सराटीत अचानक पोलिसांनी लाठीमार केला होता. हीच भयानक आठवण सांगताना मनोज जरांगे पाटील आज अक्षरशः भावूक झाले. अधिकाऱ्यांसमोर त्यांचा कंठ दाटून आला.

अधिकाऱ्यांशी बोलताना जरांगे म्हणाले, “आजच्याच दिवशी आमच्या लोकांवर गोळ्या झाडल्या होत्या. आमची लहान मुलं आईबापाला शोधत होती. इंग्रज आणि मुघलांपेक्षाही वाईट वागणूक आम्हाला मिळाली. इथे १५ दिवस रक्ताचा वास येत होता. रक्ताचा चिखल झाला होता,” हे सांगताना ते अत्यंत भावूक झाले.

मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती वेगाने खालावतेय. त्यांना रक्ताच्या उलट्या होत आहेत. अशातच सरकारकडून जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक त्यांची समजूत काढण्यासाठी उपोषणस्थळी आले. पण, जरांगेंनी अधिकाऱ्यांसमोर हात जोडले आणि थेट सरकारलाच धारेवर धरलं.

‘मंत्र्यांनी एखादं पुस्तक तरी वाचलंय का?’; जरांगेंचा संताप अन् अधिकाऱ्यांना सवाल

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जरांगेंना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. “आम्हाला तुमची काळजी आहे. सरकार सकारात्मक असून शिबिरातून प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. हैदराबाद, सातारा आणि कोल्हापूर गॅझेटनुसार काम वेगाने होत आहे,” असा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी नोडल अधिकारी नेमण्याचं आश्वासनही मित्तल यांनी दिलं.

पण, जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम होते. “तुमचा सन्मान आहे, पण सरकार मुद्दाम वेळकाढूपणा करतंय. हे प्रकरण आता तुमच्या स्तरावरचं राहिलं नाही. त्यामुळे तुम्ही इथं येऊन स्वतःची फरपट करून घेऊ नका,” असं ते स्पष्टच म्हणाले. “कशाला पाहिजेत ४ महिने? प्रत्येक गावात शिबिर सुरू होऊ शकतं. मला उद्या सकाळपासून अंमलबजावणी आणि थेट जीआर (GR) पाहिजे. तो माणूस ऐकायला तयार नाही, असा निरोप सरकारला द्या,” असा सज्जड दम त्यांनी दिला.

“तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करून अधिकारी झालात. पण यातील एकाही मंत्र्याने कधी पुस्तक वाचलंय का? ते मला शहाणपण शिकवत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. थोडक्यात सांगायचं तर, जरांगेंनी सरकारचा प्रस्ताव धुडकावला असून जोपर्यंत जीआर हातात पडत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा स्पष्ट संदेश दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही