Rupali Chakankar | दादासमोर नाक उचलून धाकुती विचारते तू काय केलंस; रूपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंचे कान टोचले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rupali Chakankar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशात अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दादासमोर नाक उचलून धाकुती विचारते तू काय केलंस? असं म्हणत रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी कवितेच्या माध्यमातून सुळेंवर टीका केली आहे.

What did you do

ट्विट करत रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) म्हणाल्या, “तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?

दादासमोर नाक उचलून

धाकुटी विचारे

तू कुठं काय केलंस?

 

चंदनाच्या खोडाला

सहाण विचारे

तू कुठं काय केलंस?

 

तो झिजला, पण विझला नाही

देहाची कुडीच विचारे

तू कुठं काय केलंस?

 

पाया भरला, विटा-वासे तोलून धरले

घराचा उंबराच विचारे

तू कुठं काय केलंस?

 

नांगर धरला, शेती केली

भुईला भीमेचं भान दिलं

मुसक्यांची गाठ विचारे

तू कुठं काय केलंस?

 

घामाला दाम दिला

कष्टाला मान दिला

रक्ताचं पाणीच विचारे

तू कुठं काय केलंस?

– प.पा.

महत्वाच्या बातम्या