Share

Ajit Pawar | मी लेचापेचा माणूस नसून माझ्या स्वभावात राजकीय आजार नाही – अजित पवार

Ajit Pawar | पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. डेंग्यूची लागण झाल्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रमात सामील होत नव्हते. अशात अजित पवार ( Ajit Pawar )  तंदुरुस्त झाले आहे. बरं होताचं ते ॲक्शन मोडमध्ये आले आहे. अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या आजारपणावरून त्यांच्याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. … Read more

Published On: 

Ajit Pawar | पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. डेंग्यूची लागण झाल्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रमात सामील होत नव्हते.

अशात अजित पवार ( Ajit Pawar )  तंदुरुस्त झाले आहे. बरं होताचं ते ॲक्शन मोडमध्ये आले आहे. अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या आजारपणावरून त्यांच्याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू होत्या.

या चर्चांवर पवार ( Ajit Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी लेचापेचा माणूस नसून माझ्या स्वभावात राजकीय आजार नाही, असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

I had dengue – Ajit Pawar

प्रसार माध्यमांशी बोलत असताना अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले, “दिवाळीच्या आधी मला डेंग्यू झाला होता. त्या आजारामध्ये माझे बरेच दिवस गेले.

त्यावेळी दुर्दैवाने मी कधी कधी टीव्ही बघायचो आणि पेपर वाचायचो. त्यामध्ये मला राजकीय आजार झालाय वगैरे बातम्या दिसत होत्या.

मी ( Ajit Pawar ) लेचापेचा माणूस नाहीये. गेल्या 32 वर्षापासून मी माझी मतं ठामपणे मांडत आहे. त्यामुळे राजकीय आजार वगैरे माझ्या स्वभावात आणि रक्तात नाही.”

दरम्यान, मराठा आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी आमने-सामने आला आहे. या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे.

यावेळी बोलत असताना अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “प्रत्येकाने आपलं मत मांडायला हवं.

मात्र, ते मांडत असताना दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी, ही माझी सर्वांना विनंती आहे.

मनोज जरांगे यांच्यासह कुणीही भडकाऊ भाषण करू नये. भाषण करत असताना कोणते शब्द वापरायला पाहिजे? हे सर्वांनी बघायला हवं.”

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही