Share

Rajasthan Royals | मुंबईला मोठा धक्का! MI ला 4 ट्रॉफी जिंकून देणारे कोच राजस्थानला देणार प्रशिक्षण

Rajasthan Royals | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही सर्वात यशस्वी फ्रेंचायसी आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. मुंबई इंडियन्सच्या या विजयामध्ये फ्रॅंचायजीचे खेळाडू, व्यवस्थापक, प्रशिक्षक इत्यादींचा समावेश आहे. अशात मुंबई इंडियन्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी … Read more

Published On: 

Rajasthan Royals | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही सर्वात यशस्वी फ्रेंचायसी आहे.

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. मुंबई इंडियन्सच्या या विजयामध्ये फ्रॅंचायजीचे खेळाडू, व्यवस्थापक, प्रशिक्षक इत्यादींचा समावेश आहे.

अशात मुंबई इंडियन्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी बॉलिंग कोच शेन बाँड (Shane Bond) यांनी एमआयची साथ सोडली आहे. या माहितीनंतर मुंबई इंडियन्सच्या चिंतेत भर पडली आहे.

Shane Bond has decided to train the Rajasthan Royals

मुंबई इंडियन्सच्या सर्वात यशस्वी बॉलिंग कोच शेन बाँड यांनी एमआयला राम राम ठोकला आहे. त्यानंतर त्यांनी राजस्थान रॉयल (Rajasthan Royals) या फ्रेंचाईजीला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

तर राजस्थानचा बॉलिंग कोच लसिथ मलिंगा याने पुन्हा एकदा मुंबईत परत येण्याचा निर्णय घेतला आहे. शेन बाँड हे 2012 ते 2015 दरम्यान न्युझीलँड संघाचे बॉलिंग कोच होते.

शेन बाँड यांच्या नेतृत्वाखाली 2015 च्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये न्युझीलँड संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर 2015 पासून ते मुंबई इंडियन्ससोबत जोडले होते.

त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल चार वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. त्यानंतर ते आता राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या संघाला प्रशिक्षण देणार आहे.

मिचेल मॅक्लनेघन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांच्यानंतर शेन बाँड आता राजस्थानच्या संदीप शर्मा, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव कुलदीप सिंह इत्यादी खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही