Supriya Sule | राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत कागदी घोडे नाचवण्याचा खेळ चालवलाय – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहे.

हे आंदोलन सुरू असताना आरक्षण मिळावं यासाठी तीन मराठा तरुणांनी आत्महत्या केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत कागदी घोडे नाचवण्याचा खेळ चालवला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

The government should call a special session for reservation – Supriya Sule

ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे उद्योग केले. केंद्र आणि राज्यात पुर्ण बहुमतातील सरकार असूनही आरक्षणाबाबत कोणताही ठाम निर्णय हे सरकार घेऊ शकले नाही.

याची परिणती आता व्यापक नैराश्येत होत आहे. मराठवाड्यातील तीन मराठा तरुणांनी तर जत तालुक्यात धनगर समाजातील एका तरुणाने या पंधरवड्यात याच नैराश्यातून आत्महत्या केल्या.

एकिकडे भाजपाने शासकीय नोकरभरतीचा खेळखंडोबा करुन ठेवला.शासकीय नोकऱ्यांच्या संधी कमी केल्या. तर दुसरीकडे आरक्षणाच्या बाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला आहे.

यांचे नेते महाराष्ट्रात एक आणि केंद्रात भलतीच भूमिका घेतात. यांच्या आरक्षणाच्या कोणत्याही भूमिकेत एकवाक्यता नाही. परिणामी मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आदी सर्व समुदायांचे आरक्षणाचे विषय अडकून पडले आहेत.

या मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने संसदेत वारंवार भूमिका मांडली आहे.मागे काही राज्यांतील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तेथील आरक्षणाच्या प्रश्नावर तेथील भाजपाच्या खासदारांनी केंद्रात पाठपुरावा करुन, सरकारवर दबाव आणून याबाबत लोकसभेत विधेयक आणून ते मंजूर करुन घेतले.

पण महाराष्ट्रातील भाजपाच्या खासदारांना हे जमले नाही कारण त्यांच्या भूमिका दुटप्पी आहेत. आम्ही वारंवार या सर्व आरक्षणाच्या बाबतीत एक विधेयक आणून ते मंजूर करुन घ्या अशी मांडणी करीत आहोत पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

आजही शासनाने आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे आणि वरील सर्व समाजांना आरक्षण देण्याबाबतचे विधेयक मांडावे, आम्ही त्याचे समर्थन करु.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.