🕒 1 min read
Maratha Reservation | नांदेड: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलन करताना दिसत आहे.
मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी दिला होता. 24 ऑक्टोबर 2023 रोजी ही मुदत संपणार आहे.
मात्र, अद्याप राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशात आता मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मराठा समाजातील तरुण आत्महत्या करत आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये 24 तासात मराठा आरक्षणासाठी दोन लोकांनी आत्महत्या केली आहे.
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी एका मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे.
नांदेड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने, मी विहिरीत उडी मारून आपला जीव देत असल्याचं आत्महत्या करणाऱ्या तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या घटनेनंतर मराठा आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
The young man died by consuming poison
दरम्यान, काल (22 ऑक्टोबर) नांदेड जिल्ह्यात एका तरुणांनी विष ग्रहण करून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. या तरुणाच्या मृतदेह शेजारी त्याची सुसाईड नोट सापडली आहे.
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळत नसल्याने त्यांनी विष प्राशन करून आपला जीव दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा तरुणांना टोकाचे पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | इस्रायल-हमास युद्धातील धोरण मोदी सरकारचा गोंधळ दाखवतं; ठाकरे गटाची टीका
- Weather Update | कुठं उन्हाचा चटका तर कुठं ढगाळ वातावरण, वाचा हवामान अंदाज
- Raj Thackeray | पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही – राज ठाकरे
- Bank Job | ‘या’ बँकेत नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर
- Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांच्या कंत्राटी भरतीच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











