Raj Thackeray | पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही – राज ठाकरे

Raj Thackeray | पुणे: आज जागतिक आर्किटेक्ट दिन आहे. या दिनानिमित्त दीपक करंजीकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत आयोजित केली होती.

यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली आहे. पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

It took a while for Mumbai to get ruined – Raj Thackeray

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “मुंबई बरबाद व्हायला, एक काळ गेला. मात्र, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. आज पुणे, पुणे राहील नाहीये. 5-5 पुणे झाले आहे.

एक हिंजवडीचं पुणे वेगळं, मधलं नदी काठचं एक पुणे, विमाननगरचं पुणे वेगळं, कुणाचा कशाला काही संबंध नाही. पुणे, पुणे म्हणून राहिलं नाही. कारण पुण्याकडे राज्यकर्त्यांचं लक्ष नाही.

मुंबई, पुणे आणि ठाण्यात बाहेरचे लोंढे येत आहे. त्यांच्यासाठी सरकार सुविधा उपलब्ध करून देत आहे. यामुळे अजून या शहरांचं नुकसान होतं आहे. मुंबईत रोज नवीन माणसं येत असतात. ती लोक कुठं जातात, कुठं राहतात, कुणाला माहीत नाही.”

दरम्यान, ठाकरे गटानं देखील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. गेल्या आठ-नऊ वर्षांत दिल्लीपासून गल्लीपर्यंत जे घाणेरडे राजकारण सुरू आहे त्यामुळेच महाराष्ट्राची ‘हवा’ खराब झाली आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या लौकिकाला काळिमा लागला.

येथील सत्ताकारणाची गुणवत्ता घसरली. नशेबाजीचा विळखा महाराष्ट्रालाही पडतो की काय, इतपत सत्ता आणि सत्ताधाऱ्यांचे प्रदूषण झाले. महाराष्ट्र म्हणजे कालपर्यंत भारताचे ‘भूषण’ होता. मागील एक-दीड वर्षात महाराष्ट्राच्या नशिबी फक्त ‘दूषण’च येत आहे.

त्यात वायू प्रदूषणाची भर पडली आहे. आता जनतेलाच या ‘कलुषित’ सरकारला घालवून महाराष्ट्राचे वातावरण पुन्हा एकदा शुद्ध आणि समृद्ध करावे लागेल, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.