Share

Supriya Sule | भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. ही घोषणा करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर शाब्दिक हल्लाबोल चढवला. कंत्राटी भरती हे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाप होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शरद … Read more

Published On: 

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.

ही घोषणा करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर शाब्दिक हल्लाबोल चढवला. कंत्राटी भरती हे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाप होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

BJP should first stop misleading the people by being hypocritical – Supriya Sule

ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. माफीनामा…! माफीनामा…!! असे ओरडत भाजपने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे.

कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती. कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपाने जरुर घ्यावा.

राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे.

उप-उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पुर्वसूरींवर फोडायची खोड आहे . उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे ‘हवाबाण’ सोडण्याची हिंमत केली नसती.

कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ व २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची.

या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही. भाजपाच्या नेत्यांना संदर्भ आठवत नसतील तर पुढील यादीतील नेत्यांना संपर्क साधावा.

२०११ सालातील मंत्री

1. विजयकुमार गावीत,
2. राधाकृष्ण विखे पाटील,
3. अजित पवार,
4. नारायण राणे,
5. दिलीप वळसे पाटील,
6.छगन भुजबळ,
7. सुनील तटकरे,
8. हसन मुश्रीफ

महाविकास आघाडीच्या शासनकाळातील मंत्री ..
1. एकनाथ शिंदे
2. अजित पवार,
3. दिलीप वळसे पाटील,
4. छगन भुजबळ,
5. उदय सामंत,
6. धनंजय मुंडे,
7. शंभूराज देसाई,
8. गुलाबराव पाटील,
9. दादा भुसे,
10. संजय राठोड,
11. संदीपान भुमरे,
12 अब्दुल सत्तार,
13. संजय बनसोडे,
14. आदिती तटकरे

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही