IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाची सुरुवात अत्यंत चांगली झाली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेतील सुरुवातीचे चारही सामने आपल्या नावावर केले आहे.
अशात आता टीम इंडियाचा पुढचा सामना रविवारी म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरोधात होणार आहे. हा सामना धर्मशाला येथे पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे.
दुखापतीमुळे टीम इंडियातील ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या हा सामना खेळणार नसल्याच्या चर्चा सुरू आहे. अशात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये कोणते खेळाडू असू शकतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
R Ashwin may get a chance to replace Hardik Pandya
न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) होणाऱ्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याच्या जागी आर अश्विनला संधी मिळू शकते. या स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळला होता. या सामन्यात त्याने 10 षटकात 34 धावा देत एक विकेट आपल्या नावावर केली होती.
त्यामुळे हार्दिकच्या जागी त्याला संघात स्थान मिळू शकते. तर चांगली कामगिरी न करता शार्दुल ठाकूरला विश्वचषक स्पर्धेमध्ये सातत्याने संधी मिळत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते सोशल मीडियावर संताप व्यक्त करताना दिसत आहे.
अशात न्युझीलँड विरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरला मैदानाच्या बाहेर राहावे लागू शकते. शार्दुल ठाकूरच्या ऐवजी मोहम्मद शमीला संघात स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
दरम्यान, आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सुरुवातीचे चारही सामने जिंकले आहेत. यानंतर भारतीय संघ आपल्या पाचव्या म्हणजेच न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) सामन्यासाठी देखील सुसज्ज झाला आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याची संभाव्य प्लेइंग-11 समोर आली आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, के एल राहुल, आर अश्विन/शार्दुल ठाकूर, शार्दुल ठाकूर\मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश असू शकतो.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार; म्हणाले…
- Vijay Wadettiwar | सरकारने नाक घासून प्रायश्चित्त केलं पाहिजे – विजय वडेट्टीवार
- Uddhav Thackeray | राज्यात सध्या ‘प्रदूषित’ सरकार आणि त्याचं ‘दूषित’ कामकाज आहे; ठाकरे गटाचं टीकास्त्र
- Weather Update | राज्यातील तापमानात चढ-उतार कायम, पाहा हवामान अंदाज
- Ajit Pawar | सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणतात…