Share

Ajit Pawar | सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणतात…

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट निवडणुकांसाठी तयारीला लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघांनीही मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

अशात सुनेत्रा अजित पवार यांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार म्हणून बॅनर झळकले आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. याच चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Will Sunetra Pawar contest the Lok Sabha elections?

सुनेत्रा पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? असा सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत अजित पवार म्हणाले, “योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही या गोष्टीचा नक्की विचार करू.

वेळ आली की त्या त्या गोष्टीचा विचार होईल.” भविष्यामध्ये काहीही होऊ शकतं असा अंदाज अजित पवार यांच्या वक्तव्यावरून बांधला जात आहे.

या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांना देखील प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला होता. तुमच्या मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आले होते.

या बॅनरवर संसदेचा फोटो दिसला होता. त्यावरून सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहे, असा सवाल माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना विचारला होता.

यावर उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाचे बॅनर मी पाहिले नाही. त्यामुळे याबद्दल मला काहीच माहित नाही.”

दरम्यान, सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे खासदार आहे.

अशात सुनेत्रा पवार यांनी जर बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर महाराष्ट्राला ननंद-भाऊजय लढत पाहायला मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट निवडणुकांसाठी तयारीला लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now