Chandrashekhar Bawankule | खोटारड्या, दुतोंडी महाविकास आघाडीनं महाराष्ट्राची माफी मागावी – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं.

त्याचबरोबर या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने आंदोलन देखील सुरू केलं होते. अशात कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे.

त्याचबरोबर यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा चांगला समाचार घेतला आहे. कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय 13 मार्च 2003 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना झाला असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अशात आता या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. खोटारड्या, दुतोंडी महाविकास आघाडीनं संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Mahavikas Aghadi should apologize to entire Maharashtra – Chandrashekhar Bawankule

ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “हातच्या कंकणाला आरसा कशाला, ही म्हण महाविकास आघाडीचे बोलबच्चन नेते सफशेल विसरले. आपणच घेतलेल्या निर्णयाची माहिती या नेत्यांना नाही.

कारण हे सगळे फेसबुकवादी!! खोटी माहिती पसरवून तरुणांची डोकी तापवण्यात यांचा ‘ हात ‘ कोणी पकडू शकत नाही. कंत्राटी भरतीचा निर्णय कोणी घेतला, कधी घेतला..हे सारेच कागदोपत्री आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात, शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनात हा खटाटोप झाला. उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं हे पाप होतं. आपले ठेवावे झाकून, दुसऱ्याचे पाहावे वाकून अशी यांची नियत.!

तेच झाले याही विषयात. आज हा मामला उघडा पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांनी कंत्राटी भरती रद्द करून हजारो तरुणांना दिलासा दिला आहे.

राज्य सरकार आणि देवेंद्रजींनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आता खोटारड्या, दुतोंडी महाविकास आघाडीनं संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. दुसरा पर्यायच नाही !!”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.