IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: काल (19 ऑक्टोबर) आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश सामना पार पडला.
या सामन्यादरम्यान भारतीय संघातील ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) गोलंदाजी करत असताना दुखापत झाली आहे.
त्यानंतर तो लंगडत मैदानाबाहेर जाताना दिसला होता. या घटनेनंतर भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली होती. अशात हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Hardik Pandya injured his left leg
बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात चेंडू अडवत असताना हार्दिक पांड्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली. पहिले तीन चेंडू टाकल्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं.
यानंतर हार्दिक पांड्यावर बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट ॲकॅडमीमध्ये उपचार करण्यात येणार आहे. हार्दिक पांड्यावर इंग्लंडचे स्पेशलिस्ट डॉक्टर उपचार करतील.
अशात 22 ऑक्टोबर 2023 रोजी न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) होणाऱ्या सामन्यातून हार्दिक पांड्या बाहेर पडला असल्याची माहिती मिळाली आहे.
या माहितीनंतर भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यातून हार्दिक पांड्या बाहेर पडला असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर तो 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये खेळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पहिले तीन चेंडू टाकल्यानंतर हार्दिक पांड्याचा डावा सांधा दुखावला. त्यानंतर तो मैदानावर खाली पडला. दुखापत झाल्यानंतर पायावर उभे राहण्यासाठी हार्दिक पांड्याला विराट कोहलीचा आधार घ्यावा लागला होता.
त्यानंतर लगेचच बीसीसीआयचे फिजिओ मैदानात धावत आले. त्यांनी हार्दिक पांड्याची दुखापत बघत त्याला प्रथमोपचार दिला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी चर्चा करून हार्दिक पांड्या मैदानातून बाहेर पडला. त्यानंतर तो संपूर्ण सामना मैदानाच्या बाहेरच होता.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! कंत्राटी भरतीचा जीआर रद्द
- Manoj Jarange | मराठा तरुणांने आत्महत्या करणं, हे सरकारचं पाप – मनोज जरांगे
- Govt Job Opportunity | केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Devendra Fadnavis | नशा करणारे असे बेताल वक्तव्य करतात; संजय राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजप नेत्याचं उत्तर
- Manoj Jarange | आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही – मनोज जरांगे