Share

Devendra Fadnavis | नशा करणारे असे बेताल वक्तव्य करतात; संजय राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजप नेत्याचं उत्तर

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं आहे. अशात आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची मती थोडी गुंग झाली असल्याचं संजय राऊत … Read more

Published On: 

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं आहे.

अशात आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मती थोडी गुंग झाली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप आमदार देवयानी फरांदे ( Devayani Farande) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सकाळी सकाळी नशा करणारे असे बेताल वक्तव्य करत असतात असं देवयानी फरांदे यांनी म्हटलं आहे.

Does Sanjay Raut take drugs? – Devendra Fadnavis

देवयानी फरांदे म्हणाल्या, “महाराष्ट्र पोलीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली काम करते. नाशिकमधील ड्रग्स प्रकरण त्यांनी उघड केलं.

त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणातील लोकांना ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे. एवढं सगळं असताना संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करत आहे.

भंग घेतली का? असं ते देवेंद्र फडणवीस यांना म्हणत आहे. मात्र, सकाळी सकाळी उठून मनोरुग्ण असा बोलू शकतो नाही तर नशा  करणारा, असं बोलू शकतो.

त्यामुळे संजय राऊतांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, असं माझं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे. संजय राऊत ड्रग्स घेतात का? हे आता बघायला हवं.”

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. “लवकरच मोठं नेक्सेस उघड होईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहे. मात्र, मोठं नेक्सेस उघड झालेलं आहे.

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते सध्या भरकटलेल्या सारखे बोलत आहे. देवेंद्र फडणवीस भांग पीत नसतील, परंतु त्याच्या वासाने त्यांना नशा येत असेल. देवेंद्र फडणवीस यांची मती थोडी गुंग झाली आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही