Weather Update | राज्यावर ‘तेज’ चक्रीवादळाचं संकट, पाहा कधी धडकणार वादळ

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. राज्यातून मान्सून परत फिरला असून ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढत चालला आहे.

उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण होताना दिसत आहे. अशात मुंबईत तेज चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Cyclone ‘Tej’ will hit the coastal areas of Mumbai and Goa on October 21

मुंबईतील नागरिक उकड्याने हैराण झालेले असताना त्यांना वादळाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

येत्या 21 ऑक्टोबर रोजी मुंबई आणि गोव्याच्या किनारी भागांमध्ये तेज चक्रीवादळ धडकणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. तर अरबी समुद्रातील पश्चिम वायव्य दिशांना येणाऱ्या वादळामुळे नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

21 तारखेपासून मुंबईसह किनारी भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, 21 ऑक्टोबरपर्यंत मध्य अरबी समुद्रावर हवेचा दबाव तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. परिणामी मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र लक्षदीप बेट आणि कोमोरीन क्षेत्रात कमी ते मध्ये स्वरूपाचे विखुरलेल्या स्वरूपातील ढग तयार होण्याचा अंदाज आहे.

तर अरबी समुद्रातील हवेच्या दबावामुळे मुंबई शहरातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा समुद्रसपाटीपासून 3.1 किमी उंचीपर्यंत प्रभाव दिसून येऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe