PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी, दुष्काळ परिस्थिती इत्यादी समस्यांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
अशात शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते. दोन हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांपर्यंत ही रक्कम पोहोचवली जाते. या योजनेतील 14 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाले आहे. शेतकरी आता या योजनेतील पंधराव्या हाताची वाट बघत आहे.
Farmers will get this installment during Diwali
प्रधानमंत्री किसान योजनेतील पंधराव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे. या योजनेतील पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना ई-केवायसी, जमिनीची पडताळणी आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे.
दिवाळीदरम्यान शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेतील पंधरावा हप्ता मिळू शकतो. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेत तब्बल अडीच कोटी बोगस शेतकरी आढळून आले आहे.
पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना काही समस्या आढळून आल्या तर शेतकरी त्यांच्या समस्या pmkisan-ict@gov.in या ईमेलवर नोंदवू शकतात. तर योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकरी या 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 क्रमांकावर संपर्क करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळे म्हणतात…
- Maratha Reservation | मराठा आंदोलन आणखीन तीव्र होणार? आरक्षणाची मागणी करत असलेल्या तरुणाची आत्महत्या
- Ajit Pawar | जयंत पाटील अजित पवार गटात करणार प्रवेश? धर्मरावबाबा आत्राम म्हणतात…
- Govt Job Opportunity | पुण्यात सरकारी नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Supriya Sule | ड्रग्स प्रकरणावर गृहमंत्र्यांनी फक्त भाषण नाही तर काहीतरी ॲक्शन घ्यावी – सुप्रिया सुळे