Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही गट येत्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी दोन्ही गटांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशात सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चांवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
I have not seen Sunetra Pawar’s banner – Supriya Sule
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार यांचे बॅनर लावण्यात आले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावले होते.
या बॅनर्सवर संसदेचा फोटो झळकला होता. त्यानंतर सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे, असा प्रश्न प्रसार माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना विचारला. या प्रश्नाचे उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सुनेत्रा पवार यांचे बॅनर मी पाहिले नाही. त्यामुळे मला याबद्दल काहीच माहित नाही.”
ड्रग्स माफिया ललित पाटील याला काल मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, “ड्रग्सच्या प्रकरणामध्ये कुणीही कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नये. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी या मुद्द्यावरील पत्रकार परिषद बघितली.
या प्रकरणामध्ये त्यांना भाषण करण्यापेक्षा ॲक्शन घेण्याची गरज आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. आम्ही ड्रग्स या विरोधात आहोत, अशी महाराष्ट्राने देशाला दिशा द्यायला हवी.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा आंदोलन आणखीन तीव्र होणार? आरक्षणाची मागणी करत असलेल्या तरुणाची आत्महत्या
- Ajit Pawar | जयंत पाटील अजित पवार गटात करणार प्रवेश? धर्मरावबाबा आत्राम म्हणतात…
- Govt Job Opportunity | पुण्यात सरकारी नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Supriya Sule | ड्रग्स प्रकरणावर गृहमंत्र्यांनी फक्त भाषण नाही तर काहीतरी ॲक्शन घ्यावी – सुप्रिया सुळे
- Sanjay Raut | गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं डोकं ठिकाणावर आहे का? – संजय राऊत