Maratha Reservation | मराठा आंदोलन आणखीन तीव्र होणार? आरक्षणाची मागणी करत असलेल्या तरुणाची आत्महत्या

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या महिन्यापासून मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी 15 हून अधिक दिवस उपोषण केलं होतं.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. उपोषण मागे घेतलं असलं तरी जरांगे यांचं आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे.

त्यांच्या या आंदोलनामध्ये अनेक तरुण सहभागी झाले आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मराठा समाज आंदोलन करत आहे. अशात आरक्षणाची मागणी करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सुनील कावळे या 45 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. मुंबई शहरातील वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर त्याने आपला जीव दिला आहे.

या घटनेनंतर मराठा आंदोलन आणखीन तीव्र होणार असल्याच्या चर्चा आता राज्यात सुरू झाल्या आहे. त्याचबरोबर त्याच्या आत्महत्येमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

We will get our reservation – Manoj Jarange

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. 24 ऑक्टोबर 2023 रोजी हे 40 दिवस पूर्ण होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही आमचं आरक्षण मिळवणारच आहोत. राज्य सरकारने आम्हाला जर आरक्षण दिलं नाही तर त्यानंतर जे आंदोलन होईल ते राज्य शासनाला झेपणार नाही.

सरकारला आम्हाला आरक्षण घ्यावं लागणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. देशात आणि राज्यात सध्या अशी एक पण शक्ती नाही जी आमचं आंदोलन थांबवू शकेल”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.