Sanjay Raut | गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं डोकं ठिकाणावर आहे का? – संजय राऊत

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. काल (18 ऑक्टोबर) मुंबई पोलिसांनी त्याला चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याने एक खळबळजनक विधान केलं आहे.

मी पळून गेलो नव्हतो, मला पळवलं होतं, असं ललित पाटील याने म्हटलं आहे. त्याच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, मुंबई आणि पुणे शहरातून आत्तापर्यंत साधारण 700 ते 800 कोटी ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवं.

ललित पाटील हा एक फक्त मोहरा आहे आणि या मोहऱ्याचा वापर राज्याचे गृहमंत्री राजकारणासाठी करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. उद्या नाशिक शहरामध्ये आमचा ड्रग्स विरुद्ध मोर्चा आहे. नाशिकसारखं शहर ड्रग्सच्या विळख्यात आहे. ड्रग्सचे दोन मोठे कारखाने नाशिक शहरामध्ये उध्वस्त करण्यात आले आहे.”

Drugs coming to Maharashtra come from Gujarat – Sanjay Raut

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “महाराष्ट्रात येणारं ड्रग्स हे गुजरातमधून येतं. हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे का? किमान दीड लाख कोटी रुपयांचं ड्रग्स गुजरातमध्ये जप्त करण्यात आलं आहे. हे ड्रग्स जप्त केलं नाही तर महाराष्ट्रात पाठवलं आहे.

महाराष्ट्र बदनाम करायचा, महाराष्ट्राची तरुण पिढी उध्वस्त करायची, सध्या हे कारस्थान सुरू आहे. हे सर्व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल तर त्यांनी खुशाल या विषयाचं राजकारण करत बसावं.

गृहमंत्री पदाच्या प्रतिष्ठेला जसं शोभेल तसं त्यांनी वागायला हवं, ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. ललित पाटील प्रकरणामध्ये दोन मंत्र्यांचा समावेश आहे, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करायला हवी. यासाठी त्यांनी चौकशी आयोग निवडायला हवा. त्याचबरोबर हिम्मत असेल तर त्यांनी त्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला हवे.

राजकारण हा सुडाचा कारखाना नाही. आम्ही आजपर्यंत कधीच सुडाचं राजकारण केलं नाही. या ड्रग्स प्रकरणाची सखोल चौकशी करून गृहमंत्र्यांनी या मागचं सत्य शोधून काढायला हवं.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.