Manoj Jarange | आरक्षण मिळालं नाही, तर जे आंदोलन होईल ते सरकारला झेपणार नाही – मनोज जरांगे

Manoj Jarange | मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे धडपड करत आहे. यासाठी ते महाराष्ट्रभर दौरे करत आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला 40 दिवसांचा वेळ दिला. 24 ऑक्टोबर 2023 रोजी हे 40 दिवस पूर्ण होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण दिलं नाही तर त्यानंतर जे आंदोलन होईल ते सरकारला झेपणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.

Does the government need truckloads of evidence to give reservation to Marathas? – Manoj Jarange

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “राज्य शासनाने महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं. मराठा आणि कुणबी एकच आहे. याचे आतापर्यंत 5000 पुरावे सापडले आहे.

मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारला ट्रकभर पुरावे हवे आहेत का? आम्ही आमचं आरक्षण मिळवणारच आहोत. आम्हाला जर आरक्षण दिलं नाही, तर त्यानंतर जे आंदोलन होईल ते राज्य शासनाला झेपणार नाही.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे. कारण आम्ही कुणबीचं आहोत. या मुद्द्यावरून काही लोक आमच्यामध्ये वाद घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत.”

पुढे बोलताना ते (Manoj Jarange) म्हणाले, “राज्य शासनाला आम्हाला आरक्षण द्याव लागणार आहे. त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सध्या देशात आणि राज्यात अशी एक पण शक्ती नाही जी आमचं आंदोलन रोखू शकेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला शब्द दिला आहे आणि त्यांच्या या वक्तव्याला संपूर्ण मीडिया साक्षीदार आहे. गेल्या 40 वर्षापासून आमचा हा लढा सुरू आहे. 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, तर काय करायचं याबाबत आम्ही 22 तारखेला निर्णय घेणार आहोत.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.